शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

झक्काझक्की - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

केवल आणि कणिकाचंही असंच झालं. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या त्या वयात, त्या त्या गोष्टी घडल्या तर संसाराची ...

केवल आणि कणिकाचंही असंच झालं. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या त्या वयात, त्या त्या गोष्टी घडल्या तर संसाराची गाडी आपलं अंतव्य स्थान गाठू शकते. एकमेकांच्या भावना, विचार समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यात नैतिक स्वातंत्र्य, ज्याचं त्याला मिळणं ही आवश्यक असतं. आपल्या विचारांचा दबाव टाकून ‘मी म्हणेन तेच झालं पाहिजे’, ही वृत्ती संसारसुखाला दुभंग करते. मग होतात तंटे, वाद-विवाद.

घर म्हटलं की तिथे भांड्याला भांडं लागलं की आवाज होतो, तसं नेहमीच घडतं. त्याला चहाच्या पेल्यातली वादळंही म्हणतात. ती क्षणिक असतात. एकमेकाला दुसऱ्याची गरज लागते. फिरलेलं डोकं ठिकाणावर येतं. पुन्हा नीटपणे जीवन सुरू होतं. केवल आणि कणिका, दोघेही कमावते होते. म्हणजे कणिकाला पैशासाठी नवऱ्यापुढे हात पसरायची गरज नव्हती. दोघांनी आपापली खाती उघडून बँक बॅलन्स करीत होते.

दोघेही शिणून थकून घरी यायचे. केवल टीव्ही लावून आरामात बसायचा. कणिकाला पदर खोचून स्वयंपाकाला जुंपून घ्यावं लागे. सासूबाई अवंतिका काकू सकाळी तिला पुष्कळ मदत करायच्या; पण रात्रीचं त्यांना कमी दिसायला लागलं होतं.

एकदा त्यांनी अनावधानाने एक गंमतच केली. एका शेगडीवर काॅफीचं आधण आणि दुसरीवर आमटीची फोडणी करून वरण ओतलं. पण प्रकार वेगळाच झाला. त्यांनी वरणात मसाल्याच्या ऐवजी काॅफी पावडर टाकली, तर काॅफीच्या आधणात गोडा मसाला. प्रेमाने दोघांना काॅफीचे कप आणून दिले. मसाल्याचा वास. केवल म्हणाला, ‘अगं आई तू काॅफीऐवजी गोडा मसाला घातला आहेस. हे कसं पिणार?’

‘काय करू बाळा, दिसतच नाही रात्रीचं?’

त्या संध्याकाळपासून कणिकावर संध्याकाळच्या रसोईची जबाबदारी अंगावर पडली.

‘अहो, तोंडी लावणं काय करू?’

‘तुला हवं ते कर.’

‘घरात भाजी नाही. बटाटे, कांदे, मिरच्या संपलंय सारं.’

‘मग मी काय करू? जा घेऊन ये.’

‘म्हणजे तुमची काहीच जबाबदारी नाही का?

‘तू बायको आहे. हवं, नको ते तू बघायला हवं.’

‘जरा जा ना चौकात. उद्यालापण भाजी लागेलच ना डब्याला?’

‘ए बाइई, मी आता मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर, नाही तर हाॅटेलचा डबा मागव.’

अवांतिका बाई आत गेल्या. शेवग्याच्या शेंगा आहेत. त्या उकड आणि पिठलं कर. मीही विसरलेच. घरात बघायचं.’

‘पण आई, ह्यांचं हे असलं वागणं आणि बोलणं योग्य आहे का? मीपण दमूनच येते ना. बहुतेक वेळा मी भाजीपाला आणतेच. पण एखाद्या वेळेला तरी ह्यांना जायला काय झालं?’

‘अगं बाई, पुरुष असेच असतात हटवादी. हेसुद्धा असेच जमदग्नीचा अवतार होते. जरा मनाविरुद्ध झालं की हे घरात आकांडतांडव. पण समजून घ्यायचं नाही. बाईचं दोन्हीकडून मरण असतं. जाऊ दे उद्या मी सगळं आणते.’

कणिकाने जेवणाची पानं घेतली. सगळी ताटं वाढली.

‘अहो, चला जेवायला. एक तर उशीर झालाय आधीच आणि उद्या मला लवकर बाहेर पडायचंय.’

केवल पानावर बसला आणि त्याचं डोकं फिरलं.

‘हे काय पिठलं-भात फक्त? तुला कितीदा मी सांगितलंय मला पिठलं हा प्रकार आवडत नाही म्हणून. जेवा तुम्हीच. मी मुळीच खाणार नाही पिठलं-भात.’

‘केवल उगीच चिडू नकोस. एखादा दिवस येतो असा. म्हणून काय एवढा थयथयाट करायचा? जेव आता.’

आईचं काहीही न ऐकता, भरल्या ताटात पाणी ओतून केवल बेडरूममध्ये झोपायला गेला.’