किरकोळ कारणांवरून युवकाला दगडाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:29 IST2020-08-13T17:28:13+5:302020-08-13T17:29:00+5:30
किरकोळ कारणांवरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रकार कनाननगर येथील विश्वशांती चौकात घडला.

किरकोळ कारणांवरून युवकाला दगडाने मारहाण
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रकार कनाननगर येथील विश्वशांती चौकात घडला.
या हल्ल्यात अजय रमेश चव्हाण (वय १९, रा. एपीजे स्कूल कंपौंडनजीक, कनाननगर) हल्लेखोराने दुचाकीचेही नुकसान केले. या प्रकरणी राजू शिवाजी जाधव (रा. कळंबा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, विश्वशांती चौकानजीक अजयचा मामेभाऊ सोन्या व संशयित राजू जाधव हे दोघे बोलत उभे होते. यावेळी अजय तेथे आला. त्याने शेजारी खेळणाऱ्या लहान मुलांना हटकले.
या रागातून तो आपल्यालाच बोलला असल्याचा गैरसमज करून राजू जाधव याने रागाच्या भरात रस्त्याकडेला पडलेला दगड घेऊन फिर्यादी अजयच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले.
त्यानंतर त्याने सोन्या याची दुचाकी खाली पाडून त्याचे नुकसान केले. जखमी अजयवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात राजू जाधव याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.