शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

युवकांनी सामाजिक बांधिलकीतून एड्स जनजागृतीचे कार्य करावे, अभिनेते अवधूत जोशी यांचे आवाहन

By संदीप आडनाईक | Published: December 01, 2023 4:59 PM

कोल्हापुरात एड्स नियंत्रण विभागाच्या प्रभात फेरीला प्रतिसाद

कोल्हापूर : तारुण्यात अनेक प्रकारच्या आकर्षणामुळे विपरीत पाऊल पडण्याची शक्यता असते. याच वयात योग्य दिशा मिळाल्यास आणि खबरदारी घेतल्यास एचआयव्ही पासून दूर राहता येते, असे प्रतिपादन सिने अभिनेते अवधूत जोशी यांनी केले.कोल्हापुरात  जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत शुक्रवारी जागतिक एड्स दिनानिमित्त सीपीआर हॉस्पिटलतर्फे काढलेल्या प्रभातफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख होत्या. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ. माधव ठाकूर, अंजली देवरकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी एचआयव्ही एड्स म्हटलं की भयानकता जाणवायची. या आजाराबद्दल भरपूर गैरसमज होते.माहिती शिक्षण ,संवाद आणि एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे सध्या ही परिस्थिती बदललेली आहे. युवकांनी तारुण्यात खबरदारी घ्यावी व सामाजिक बांधिलकी म्हणून एड्स जनजागृती चे कार्य करावे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी प्रास्तविक केले. त्यांनी "आता पुढाकार समुदायाचा" ही यावर्षीची संकल्पना असून यापुढे समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे, असे सांगितले. डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, जिल्ह्यात सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये एचआयव्ही समुपदेशन व चाचणी मोफत केली जाते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींकरिता दिल्या जाणाऱ्या एआरटी औषधोपचारांमुळे संसर्गित व्यक्तीचे आयुर्मान वाढवण्यास मदत झाली आहे, तसेच नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी कमी झाली आहे.

एड्स दिनानिमित्त विशेष मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शपथ वाचन निरंजन देशपांडे यांनी केले. यावेळी डॉ. ऋतुजा कदम, डॉ. सुभाष जगताप, मकरंद चौधरी, कपिल मुळे, अभिजित रोटे, संजय गायकवाड, दीपक सावंत, संदीप पाटील, पल्लवी देशपांडे, शिल्पा अष्टेकर, मनीषा माने, क्रांतीसिंह चव्हाण, राजेश गोधडे, सतिश पाटील, प्रेमजीत सरदेसाई, रविराज पाटील उपस्थित होते. या फेरीत न्यू काॅलेज, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, विवेकानंद कॉलेज, डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्ससह इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHIV-AIDSएड्स