जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील तरुणाचा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. संदेश लक्ष्मण शेळके (वय २२) असे मृताचे नाव आहे. संदेश हा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाट्यावर बहिणीला सोडून मोपेडवरून गावाकडे येत होता. मध्येच दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदेशवर हल्ला केला. धारदार हत्याराने मानेवर, पाठीवर वर्मी घाव झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला.
वाचा- पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी केली. हा खुन नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.