शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: शिरोळमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून, सातजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST

खुनामागे अन्य कारण?

शिरोळ : जुन्या भांडणाचा वाद मनात धरून येथे तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. दीपक दशरथ मगदूम (वय २०, रा. शिवाजीनगर, शिरोळ) असे मृताचे नाव असून, खूनप्रकरणी परवेज सरदार शेख (वय २०, रा. शिवाजी चौक), रोहन जुगनू कांबळे (२२, रा. रमाबाई सोसायटी), प्रज्योत अनिल साळोखे (२३, रा. केडीसीसी बँकेसमोर), ऋषिकेश राजू कांबळे (२१, रा. दत्तनगर क्रांती चौक), शुभम संतोष पाटील (वय १८, रा. काळी मस्जिदजवळ), प्रतीक गजानन सावंत (वय २२, रा. दत्तनगर क्रांती चौक), विनायक किशोर साळुंखे (वय २३ रा. चिंचवाड फाटा, सर्व रा. शिरोळ) या सातजणांना शिरोळ पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी दीपक याचा मित्र अमोल संतोष सावंत (२०, रा. शिवाजीनगर) याने पोलिसांत तक्रार दिली. ही घटना सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटी येथील शेताजवळ घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आणि दीपक यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून परवेज शेखने दीपक याला सोमवारी रात्री कुरुंदवाडला जायचे असल्याचे सांगून मोटारसायकलवरून नदीवेस रस्त्यावरील शेताजवळ आणले. यावेळी शेख याने दीपकच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला. त्या ठिकाणी लपून बसलेल्या रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे यांनी दीपकला ओढत शेतात नेले, तेथे त्याला दगडाने मारहाण केली. यादरम्यान रोहन कांबळेने कोयत्याने वार केल्याने दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले.दरम्यान, तक्रारदार अमोल याने मित्राकरवी रुग्णवाहिकेतून दीपकला मिरज येथील येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी सकाळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके आणि पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दीपक याचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला.

खुनामागे अन्य कारण?जुन्या वादातून दीपकचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले, तरी गांजा विक्रीबाबत त्याने टीप दिली होती. या कारणातून की अन्य कारणांतून खून झाला, याचादेखील पोलिस तपास करीत आहेत.

मारा रे याला !घटनास्थळी आल्यानंतर परवेजने मारे रे याला, असे म्हणत दीपकच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला. अगोदरच दबा धरून शेतामध्ये बसलेल्या उर्वरित आरोपींनी त्याला ओढत शेतात नेऊन दगडाने मारहाण केली. शिवाय तक्रारदार अमोलला तुला बघून घेतो, अशी धमकी देत आरोपींनी पलायन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस