शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: गांधीनगरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:35 IST

गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) ...

गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सुमारे पाच ते सहा संशयित मारेकरी हे येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील असल्याचे समजते. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, विठ्ठल हा आई, वडील, बहीण आणि भावासोबत कोयना कॉलनी गांधीनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. येथील गांधी मैदानाच्या मागील बाजूस असणाऱ्या कुमार पान शॉपपासून मारेकऱ्यांनी विठ्ठल याला तलवार आणि कोयत्याचे वार करत बाजूच्या जीपी ग्रुपपर्यंत पाठलाग करत व वार करत आणले. त्याठिकाणी त्याला मारून टाकून मारेकरी पळून गेले.मारेकऱ्यांनी विठ्ठलच्या हातावर तसेच चेहऱ्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले होते. विठ्ठल हा येथील एका कापड दुकानात नोकरी करत होता. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ करत आहेत.

नातेवाईकांचा आक्रोशगांधीनगर वसाहत रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नातेवाईकांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले पण नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

संशयितांना लवकरच ताब्यात घेऊबघ्यांना पांगवण्यसाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पोलिसांनी संशयितांना लवकरच ताब्यात घेण्याचे आश्वासित केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस