शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रस्त्यातील विजेचा खांब चुकविण्याच्या नादात कंटेनरची दुचाकीला धडक, युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:05 IST

गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट

शिरोली : शिये-कसबा बावडा रस्त्यावर मालवाहतूक कंटेनर आणि दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. उत्कर्ष सचिन पाटील (रा. महाडिक कॉलनी, टोप) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास उषा नर्सरीसमोर झाला.घटनास्थळावरून आणि शिरोली पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, टोप येथील उत्कर्ष पाटील हा युवक बारावीच्या क्लाससाठी कसबा बावडा येथे दुचाकीवरून जात होता. शिये फाटा ओलांडून उषा नर्सरी येथून जात असताना कसबा बावडाकडून शियेच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरचालकाला रस्त्याच्या मधोमध डाव्या बाजूस असणाऱ्या विजेच्या खांबाचा अंदाज आला नाही.त्यामुळे त्याने गाडी उजव्या बाजूला वळविल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला कंटेनर धडकला. त्यामुळे उत्कर्ष पाटील गाडीवरून डोक्यावर पडला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

रस्त्यावर मधोमध खांब धोकादायकशिये फाटा ते परमार पेट्रोल पंपपर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण, या रस्त्यात अनेक विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत. हे खांब महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वय नसल्यामुळे काढण्यात आलेले नाहीत. हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. सोमवारी झालेला अपघात हा रस्त्यावर मधोमध असलेल्या खांबांमुळेच झाल्याची घटनास्थळावर चर्चा सुरू होती.

गतिरोधक नसल्याने वाहने सुसाटया रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम झाले असले तरी कुठेही गतिरोधक बसविलेला नाही. शिये फाटा ते बावड्यापर्यंत रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक वसाहत असल्याने जवळच परप्रांतीय कामगार राहत असल्याने येथे सतत वर्दळ असते. तसेच एक परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. याचा विचार करून गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.

दुभाजकाचा पत्ताच नाहीया रस्त्यावर कुठेही दुभाजक उभारलेले नाहीत. त्यामुळे सुसाट वेगाने जाणारी वाहने कशाही पद्धतीने ओव्हरटेक करत असल्याचे दिसून येत आहे. लोकांचे जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू