Kolhapur: रुग्णालयावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या, जयसिंगपुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 11:59 IST2024-10-15T11:58:35+5:302024-10-15T11:59:12+5:30
वडिलांवर सुरू होते त्याच रुग्णालयात उपचार

Kolhapur: रुग्णालयावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या, जयसिंगपुरातील घटना
जयसिंगपूर : वडिलांवर ज्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्याच रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून मुलाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील पायोस रुग्णालयात घडली. हार्दिक प्रकाश रूपानी (वय ३८, रा. गल्ली नं. ६, जयसिंगपूर), असे मृताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
२९ सप्टेंबर २०२४ रोजी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाटा येथे मोपेड व दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये मोपेडस्वार प्रकाश रूपानी यांना दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हार्दिक हादेखील रुग्णालयात त्यांच्यासोबत असायचा. पहाटेच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.