शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

उदगावमधील दरोड्याच्या तपासासाठी तेरा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रविवारी मध्यरात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यात महिलेला ठार करून आठ लाख रुपयांचा ऐवज लूटप्रकरणी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निकम कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी घटनास्थळाची पाहणी करून या घटनेचा तत्काळ तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले.यावेळी नांगरे-पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रविवारी मध्यरात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यात महिलेला ठार करून आठ लाख रुपयांचा ऐवज लूटप्रकरणी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निकम कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी घटनास्थळाची पाहणी करून या घटनेचा तत्काळ तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले.यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, दरोडेखोरांचा तत्काळ शोध घेणे गरजेचे आहे. या घटनेमुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत खळबळ उडाली असून, या घटनेचा शोध घेण्यासाठी तेरा पथके तैनात करण्यात आली आहेत. घटना गंभीर आहे, त्यामुळे दरोडेखोरांना जेरंबद करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. यावेळी पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, विनायक नरळे, शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल, जयसिंगपूरचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम उपस्थित होते.निकम यांच्या प्रकृतीत सुधारणाजखमी बाबूराव निकम यांच्यावर मिरज येथील मिशन रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांना मानसिक धक्का बसला असून, अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर तपासासाठी अडचणी येत आहेत. उपअधीक्षक रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा विशेष पथके कार्यरत आहेत.पोलीस चौकी गरजेची : गेल्या दहा वर्षांपासून उदगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून उदगाव येथे पोलीस चौकीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अपघात, वाढते गुन्हे व अशा प्रकारचे दरोडे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीने पोलीस चौकीसाठी जागाही उपलब्ध करून देऊ, असे सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.