शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 22:49 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला.

आंबा: गरोदर प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने  प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला.

 दि.21 रोजी मिरजोळे येथील हेमंत जितेंद्र मयेकर यांनी बहिण बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीसात दिली. याप्रकरणी खंडाळा येथील बार व्यावसायिक दुर्वास दर्शन पाटील (वय ३०.) यास पोलीसांनी संशियत म्हणून ताब्यात घेतले. तपासात त्याने खून केल्याचे कबूल केले.

आज दोन वाजता सहकारी आरोपींना घेऊन रत्नागिरी व देवरूख पोलीसांचे पथक घाटात दाखल झाले.आंब्यातील अपघात मदत पथकातील पंधरा तरूणांना पोलीसांनी पाचारण करून दरीतील मृतदेहाचा शोध घेतला. व पथकाने दरीत उतरण्यास वाट तयार करून घेतली.

तीन तासानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर,विवेक पाटील,मुख्य आरोपीस घेऊन घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह काढण्यास सव्वा पाचला मदत पथक  दरीत उतरू लागले.सायंकाळ होवू लागल्याने दरीत धुके दाटले होते.पावसाची रिपरिप चालूच होती.तीन दोरखंड गाडीच्या चालकाला बांधून त्याच्या सहाय्याने सहा तरूण घसरच दरीत उतरले.वीस मिनिटांत मृतदेह प्लस्टिक मध्ये बंदिस्त करून रस्तावर आणला गेला. दरीत खाली साठ फूट खोल झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.

फिर्यादी व आरोपी व साक्षिदार यांच्या समक्ष मृतदेहाची ओळख पटवली. अंगावरील गुलाबी नक्षीकाम ड्रेस व हातावरील टॅटू वरून भाऊ हेमंत याने भक्ती बहीणाची ओळख पटवली.साडे सहानंतर साखरपा येथे आरोग्य ‌केंद्रात शवविच्छेदनास मृतदेह नेला.

    बारा दिवसापूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा सडून कवटी शिल्लक राहीली होती. सतत पाऊस असल्याने दुर्गंधी पसरलेली नव्हती. आंबा गावातील मदत पथक सरसावले आंबा घाटात अपघात असो की अन्य गुन्हेगारी घटना असो.पोलीस अधिकारी येथील पथकामदत पथकातील विजय पाटील, दिनेश कांबळे, दिनेश गवरे,दिपक भोसले,सागर चाळके,व्दिग्वीज गुरव,शंकर डाकरे यांचेसह पंधरा तरूणांनी मृतदेह दरीतून वर घेण्यास योगदान दिले.

उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर,विवेक पाटील, ,एल.सी.बी.पोलीस निरीक्षक नितीन ढेरे,देवरूख पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, डी.वाय.एस.पी.सुरेश कदम‌ . हवालदार सचिन कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.भक्ती व दुर्वास यांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. गरोदर राहील्याने तीने लग्नाचा हट्ट धरला पण त्याने विरोध केला. प्रेयसी ऐकत नाही हे पाहता आपल्या जिवनातील अडथळा दूर करण्यासाठी तिचा खून करून तिचा मृतदेह रत्नागिरी पासून सत्तर‌ किलोमिटरवरील गायमुख जवळील दरीत फेकून दिला.तिच्या खूनानंतर दोन दिवसांत त्याने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याची संतापजनक बाब मयेकर कुटूबियांकडून समजली.

 मित्राचा खून केल्याचा संशय

दुर्वास पाटील मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.त्याच्या मालकीचे खंडाळा येथे बार व दारूचे दुकान आहे.दहा महिन्यांपूर्वी खंडाळा येथील  तरूण बेपत्ता आहे.त्याचाही खून करून याच दरीत फेकल्याचे तपासात पुढे आले आहे.त्याचाही तपास करण्याचे ठरले होते पण धुके व अंधार पडू लागल्याने हा तपास पुढे ढकलण्यात आला.