शिक्षकाच्या त्रासाने युवतीची आत्महत्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून लावला होता लग्नाचा तगादा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:57 IST2022-01-29T11:56:53+5:302022-01-29T11:57:49+5:30

अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.

Young woman commits suicide due to teacher's harassment in Arjunwada taluka Kagal | शिक्षकाच्या त्रासाने युवतीची आत्महत्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून लावला होता लग्नाचा तगादा 

शिक्षकाच्या त्रासाने युवतीची आत्महत्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून लावला होता लग्नाचा तगादा 

मुरगूड : सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून अर्जुनवाडा तालुका कागल येथील एका महाविद्यालयीन युवतीने सहा दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. उपचार सुरु असताना या युवतीचा काल, शुक्रवारी मृत्यू झाला. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय १९)असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी संशयित आरोपी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी ता.कागल येथील एका शाळेमध्ये अमित कुंभार हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडिया च्या माध्यमातून नेहमी त्रास देत होता. गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिलासा तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन हा आणि असेच संदेश तो पाठवत होता.

त्याच्या  या वारंवार त्रासाला कंटाळून आकांशाने २२ जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.

Web Title: Young woman commits suicide due to teacher's harassment in Arjunwada taluka Kagal