तरूणांनो, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:24+5:302021-02-05T06:59:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : देशात कष्टकरी आणि भांडवलदार असे दोन वर्ग आहेत. त्यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण ...

Young people, give justice to those who work hard | तरूणांनो, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्या

तरूणांनो, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : देशात कष्टकरी आणि भांडवलदार असे दोन वर्ग आहेत. त्यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण झाली असून, कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केले.

निलजी (ता. गडहिंग्लज) येथे जनता दल युवा शक्ती शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेची निवडणूक ताकदीने लढविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. उपनगराध्यक्ष महेश कोरी म्हणाले, ग्रामीण लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी युवकांनी झोकून द्यावे. यावेळी कोरोना लढ्यात मोलाचे योगदान दिलेले डॉक्टर, माजी सैनिक, आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर, राम मजगी, अजितसिंह शिंदे, आप्पासाहेब पाटील, फिरोज सय्यद, संजय पाटील, परसू परसापगोळ, आप्पासाहेब हुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अजय मजगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सविता वाळकी यांनी आभार मानले.

--------------------------

फोटो ओळी : निलजी (ता. गडहिंग्लज) येथे जनता दल युवा शक्ती शाखेचे उद्घाटन उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीपतराव शिंदे, राजेंद्र मांडेकर, अजय वाळकी उपस्थित होते.

क्रमांक : ०३०२२०२१-गड-०२

Web Title: Young people, give justice to those who work hard