शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणाला पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील तरुणाला न्यायालयाने दोषी ठरवले. कुमार महादू गायकवाड (वय ३०, रा. नवीन ...

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील तरुणाला न्यायालयाने दोषी ठरवले. कुमार महादू गायकवाड (वय ३०, रा. नवीन वसाहत, राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) याला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) एस. आर. पाटील यांनी ठोठावली. सरकारतर्फे ॲड. प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, शहर परिसरातील एक सात वर्षीय मुलगी १२ जून २०१३ रोजी दुपारी रिक्षात खेळत होती. यावेळी तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कुमार गायकवाडने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईने याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार गायकवाड याच्यावर बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. बी. लांडगे यांनी केला.

या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. जाधव यांनी बाजू मांडली. यातील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर कुमार गायकवाडला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. यासाठी सरकार पक्षाला राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी अशोक शिंगे, सहाय्यक फौजदार एम. एम. नाईक यांचे सहकार्य मिळाले.

फोटो नं. २००२२०२१-कोल-कुमार गायकवाड (आरोपी)