शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखाना आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुम्हीच सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

75 लाखांचा धनादेश केला अदा कागल : ब्रिक्स कंपनीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तोटा सहन करून आठ वर्षे कारखाना चालविला. यामध्ये ...

75 लाखांचा धनादेश केला अदा

कागल : ब्रिक्स कंपनीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तोटा सहन करून आठ वर्षे कारखाना चालविला. यामध्ये शेतकऱ्यांना एफआरपीसह कामगारांचे पगार-बोनस, तोडणी वाहतूक बिले वेळेवर दिली. मशिनरीवरही प्रचंड खर्च केला आहे. इतके करूनही ब्रिक्सला जणूकाही ईस्ट इंडिया कंपनीच ठरवून त्रास देण्याचा केलेला प्रयत्न आहे. मुश्रीफ साहेब आंदोलनासारख्या मार्गाने तुम्हाला मनस्ताप दिल्याबद्दल, तसेच या काळात तुमच्यावर भलीबुरी टीका केली असेल तर माफ करा; परंतु भविष्यातही या कारखान्याचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुम्हीच सोडवा, असे साकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी जि.प सदस्य शिवाजीराव खोत यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घातले.

गेल्या ३६ दिवसांपासून अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. आज यावर मार्ग निघाला. एकूण दीड कोटी थकीत रकमेपैकी ७५ लाखांचे धनादेश आज दिले, तर उर्वरित ७५ लाख एक महिन्यानंतर दिले जाणार आहेत. यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आले होते. तेव्हा शिवाजीराव खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

चौकट

○ ब्रिक्स कंपनीचा रामराम घ्यावा

मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुम्ही आंदोलनाला बसलाय म्हणून नव्हे तर कंपनीने यावर्षी कारखाना सोडून जायचं हे ठरवलंच होतं. तशी पूर्वकल्पना शासनाला दिलेलीही आहे. हा हंगाम संपण्यापूर्वीच शासनाला तसे लेखी पत्र देणार आहोत. कारण, पुढील हंगाम चालू करण्यासाठी संचालक मंडळाला तयारी करावी लागते. तो अवधीही त्यांना मिळाला पाहिजे. एक लोकप्रतिनिधी म्हणून साखर कारखाना व कर्मचाऱ्यांना आपले सहकार्य कायमच राहील.

फोटो ओळी

कागल अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत देणीपोटी ७५ लाखांचा धनादेश आज ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.