तुम्ही अध्यक्ष बना, मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करतो, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर -video

By पोपट केशव पवार | Updated: May 17, 2025 19:14 IST2025-05-17T19:14:00+5:302025-05-17T19:14:50+5:30

'माझा पक्ष भाजपच्या सत्तेत असला तरी त्यांचे सगळेच विचार आम्ही स्वीकारतो असे नाही'

You become the president I will work under your leadership, Minister Ramdas Athawale's open offer to Prakash Ambedkar | तुम्ही अध्यक्ष बना, मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करतो, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर -video

तुम्ही अध्यक्ष बना, मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करतो, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर -video

कोल्हापूर : राज ठाकरे- उद्धव ठाकरे, शरद पवार-अजित पवार हे एकत्र येण्याची शंका वाटते. मात्र, सध्या समाजाच्या ऐक्यासाठी रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी एकत्र येणे काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी विसर्जित करुन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे, अशी खुली ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे (आठवले गट) संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य हवे आहे. सध्या त्याची नितांत गरज आहे. समाजाच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष विसर्जित करुन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे. मी मंत्रीपदाचा त्याग करुन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. मला समाजापेक्षा मंत्रीपद महत्त्वाचे नाही. माझा पक्ष भाजपच्या सत्तेत असला तरी त्यांचे सगळेच विचार आम्ही स्वीकारतो असे नाही. माझा पक्ष आंबेडकरवादी विचारसरणीने चालत असल्याचा दावाही आठवले यांनी केला.

Web Title: You become the president I will work under your leadership, Minister Ramdas Athawale's open offer to Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.