शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

तू माझ्या नातवासारखा, माझ्या मुलाएवढाच मोठा हो..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 5:35 AM

हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले.

शिरोळ (जि.कोल्हापूर) : लोकसभा निवडणुकीचा निकाल संपल्यानंतर द्वेषाच्या राजकारणाला मूठमाती देत हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. ‘माझ्या नातवासारखा आहेस, मनात काही न घेता काम करत राजू शेट्टींएवढा मोठा हो’ असा आशीर्वादही रत्नाबाई यांनी दिल्याने घरातील वातावरण चांगलेच भावनिक झाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नेत्यांमध्ये टोकाची इर्ष्या पाहायला मिळाली असताना विरोधकाच्या घरी जाउन प्रतिस्पर्ध्यांची भेट घेत एक वेगळाच संदेश माने यांनी दिला आहे. धैर्यशील माने सुद्धा माझ्या नातवासारखे आहेत, जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा, असा आशीर्वाद शेट्टींच्या आईंनी माने यांना दिला.तुम्हाला भेटायला म्हणून मी खास आलोय, असे माने राजू शेट्टी यांच्या आईचे पाया पडून आशिर्वाद घेताना म्हणाले. आशिर्वाद माझा भरपूर आहे, माझा मुलगा जसा केला, तसे कर, माझा आशिर्वाद मोठा आहे, असा आशिर्वाद त्यांनी दिला. तुमच्या आशिर्वादाने सगळेच चांगले होतेय, तुमचा आशिर्वाद असल्यावर काही कमी पडणार नाही, असे माने यांनी सांगितले.यावेळी शेट्टी यांनीही माने यांना लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडावेत असा सल्ला दिला. माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला, जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.यावेळी फेटा बांधून पुष्पगुच्छ देत राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने यांचा सत्कार केला. राजू शेट्टी यांच्या घरात यावेळी माने यांचे औक्षणही केले. या भेटीप्रसंगी धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि राजू शेट्टी यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी