शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून दोन दिवस ’यलो अलर्ट’; धरणांमध्ये किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:18 IST

दिवसभर ऊन-पावसाचा खेळ श्रावण महिन्याची अनुभूती देत राहिला

कोल्हापूर : कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यात सर्वत्र रविवारी दिवसभरात अधूनमधून पावसाची सरी कोसळत राहिल्या. धरण क्षेत्रातही पाऊस सुरू असून, पाणी साठ्यात वाढ होत आहे. आज, सोमवारपासून दोन दिवस हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी अधूनमधून का असेना पण पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहर परिसरात पावसाची एक जोरदार सर कोसळून गेली की लगेच ऊन पडत होते. दाटून आलेले आकाश एकदम रिकामे होत असे. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ श्रावण महिन्याची अनुभूती देत राहिला.गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही सरासरी ७० मिलिमीटर पाऊस कोसळला. वारणा धरणातून १७१५, तर दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण, राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१०० घनफूट विसर्ग कायम असल्याने भोगावती व पंचगंगा नदीची पातळी हळूहळू कमी होत आहे.अद्याप ३६ बंधारे पाण्याखाली असून, जिल्ह्यात सहा ठिकाणी खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’, तर बुधवारी (दि. २) जिल्ह्यातील घाट माथ्यावरील तालुक्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा..धरणसाठा - टीएमसीत - कंसात क्षमता

  • राधानगरी - ५.५१ - (८.३४)
  • तुळशी - २.११ - (३.४१)
  • वारणा - २२.९९ - (३४.३९)
  • दूधगंगा - ११.७९ - (२५.३९)
  • कासारी -१.६७ - (२.७७)
  • कडवी - १.६६ - (२.५३)
  • कुंभी - १.७७ - (२.७१)
  • पाटगाव - २.६५ - (३.७१)