शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याला 'यलो अलर्ट'; पावसाची रिपरिप सुरु असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ, राधानगरीचे दोन दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:58 IST

२४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस होता. धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने धरणातील विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ४३५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी २२.०९ फुटांवर असून २४ बंधारे पाण्याखाली आहेत.गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सकाळपासून पाऊस जरा अधिक राहिला. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. ग्रामीण भागात मात्र पाऊस अधिक राहिला. हवामान विभागाने शुक्रवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात रिपरिप सुरू आहे.धरण क्षेत्रातही पाऊस काहीसा वाढल्याने सर्वच धरणांतील विसर्ग वाढला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ४३५६, वारणातून ४८५२ तर दूधगंगेतून ४६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी वाढत असून धरणातील विसर्ग पाहता नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात पावसाची रिपरिप असली तरी हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. दिवसभर थंड वारे जाेरात वाहत असल्याने गारठा वाढला आहे.आजपासून यलो अलर्टआज, शनिवारी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील. घाटमाथ्यावर मात्र मुसळधार होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

पडझडीत ३.६५ लाखांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर ८ खासगी मालमत्तांची पडझड होऊन त्यामध्ये ३ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.