यंदा पवारांच्या घरात खासदार नसणार , राज्यात युतीला ४४ जागा-चंद्रकांत पाटील याचे भाकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 18:58 IST2019-05-22T18:45:42+5:302019-05-22T18:58:27+5:30
मला झोपेतून जरी उठल्यावर विचारले तरी देशामध्ये भाजपला २९0, महाराष्ट्रात युतीला ४४ आणि पश्चिम महाराष्ट्रात १0 जागा युतीला मिळणार हेच मी सांगेन. शरद पवार यांच्या घरात यंदा लोकसभेचा खासदार नसेल असे भाकित

यंदा पवारांच्या घरात खासदार नसणार , राज्यात युतीला ४४ जागा-चंद्रकांत पाटील याचे भाकित
कोल्हापूर : मला झोपेतून जरी उठल्यावर विचारले तरी देशामध्ये भाजपला २९0, महाराष्ट्रात युतीला ४४ आणि पश्चिम महाराष्ट्रात १0 जागा युतीला मिळणार हेच मी सांगेन. शरद पवार यांच्या घरात यंदा लोकसभेचा खासदार नसेल असे भाकित महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निकालाच्या आदले दिवशी बुधवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपला अंदाज ठामपणे वर्तवला. यावेळी त्यांनी दुष्काळ, कर्जमाफी आणि एव्हीएम मशिन्स याबाबतही मते व्यक्त केली.
शेटटींनी शेतकºयांची दु:खं सांगू नयेत
मी शेतकºयाचाच मुलगा आहे. त्यामुळे राजू शेटटी यांनी शेतकºयांची दु:खं आम्हांला सांगू नयेत. त्यांची शेती किती आहे मला महित नाही. मात्र माझीही अडीच एकर शेती आहे. त्यांची बागायती असेल पण माझी जिरायती आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेटटी यांच्यावर या पत्रकार परिषदेत पलटवार केला.