गडमुडशिंगीत श्री लक्ष्मीदेवी मंदिराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:55+5:302021-02-05T07:06:55+5:30

गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

The year-round celebration of Shri Lakshmidevi temple in Gadmudshingi with enthusiasm | गडमुडशिंगीत श्री लक्ष्मीदेवी मंदिराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

गडमुडशिंगीत श्री लक्ष्मीदेवी मंदिराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी हद्दीतील काही क्षेत्र संपादित केले आहे. या संपादित क्षेत्रामध्ये गडमुडशिंगी गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीचे पुरातन मंदिर येत असल्याने हे मंदिर स्थलांतरित करणे आवश्यक होते. त्यामुळे हे मंदिर गावातील कोल्हापूर-हुपरी रोडलगत असणाऱ्या नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले. गावचे तत्कालिन उपसरपंच तानाजी पाटील यांनी या कामात पुढाकार घेत नवीन भव्य मंदिराची उभारणी करून या मंदिरात श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची २९ जानेवारी २०२० रोजी पुनःप्रतिष्ठापना केली. याला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याचा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. श्री लक्ष्मीदेवी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेला २९ जानेवारी २०२१ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: The year-round celebration of Shri Lakshmidevi temple in Gadmudshingi with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.