वयोवृध्दांने आणलेला पुष्पहार त्यांच्याच गळ्यात; विजयाची शिल्पकार जनताच : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:28 IST2019-10-25T15:20:26+5:302019-10-25T15:28:27+5:30

एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावल्यानंतर आमदार म्हणून आता त्यांची नवीन इनिंग सुरु झाली. त्यास अनेक जण सुभेच्छा देत होते. - माझ्या विजयाची शिल्पकार जनताच

A year of congratulations on Chandrakant Jadhav | वयोवृध्दांने आणलेला पुष्पहार त्यांच्याच गळ्यात; विजयाची शिल्पकार जनताच : जाधव

तुम्हीच शिल्पकार - माझ्या विजयाची शिल्पकार जनताच आहे असे सांगत चंद्रकांत जाधव यांनी भेटायला आलेल्या वयोवृध्दांने आणलेला पुष्पहार त्यांच्याच गळ्यात घातला. छाया : नसीर अत्तार

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’मधील कॉँग्रेसचे विजयी उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्यावर शुक्रवारी दिवसभर कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य मतदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. शुक्रवारी दिवसभर जाधव यांना भेटायला त्यांच्या सम्राटनगर काशीद कॉलनीतील निवासस्थानी अक्षरश: रीघ लागली होती. त्यामध्ये महिलांसह वयोवृध्द व तरुणांचा मोठा समावेश होता.

निवासस्थानातील तळमजल्यावर चंद्रकांत जाधव यांचे कार्यालय आहे, निवडणुकीत तेथूनच सगळी प्रचार यंत्रणा राबविली गेली. शुक्रवारी हे कार्यालय समर्थकांसह पुष्पगुच्छ, पुष्पहार यांनी फुलून गेले. चंद्रकांत जाधव यांच्या सोबत सेल्फी, फोटो घेण्यातही अनेकांचा उत्साह दिसून आला. एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावल्यानंतर आमदार म्हणून आता त्यांची नवीन इनिंग सुरु झाली. त्यास अनेक जण सुभेच्छा देत होते.

  • तुम्हीच शिल्पकार - माझ्या विजयाची शिल्पकार जनताच आहे असे सांगत चंद्रकांत जाधव यांनी भेटायला आलेल्या वयोवृध्दांने आणलेला पुष्पहार त्यांच्याच गळ्यात घातला. 

Web Title: A year of congratulations on Chandrakant Jadhav