यशवंत बँकेची बँको ब्लू रिबन पुरस्कारासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:25+5:302021-02-05T07:06:25+5:30
पाटील म्हणाले, हा पुरस्कार ‘फायनान्शियल साऊंड ॲण्ड वेल मॅनेज्ड’ या श्रेणीतील असून यामध्ये रिझर्व्ह बँकेचे सक्षमतेचे सर्व निकष पूर्ण ...

यशवंत बँकेची बँको ब्लू रिबन पुरस्कारासाठी निवड
पाटील म्हणाले, हा पुरस्कार ‘फायनान्शियल साऊंड ॲण्ड वेल मॅनेज्ड’ या श्रेणीतील असून यामध्ये रिझर्व्ह बँकेचे सक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या बँकांना हा पुरस्कार दिला जातो. बँकेने गेल्या चार वर्षांत सव्वाशे कोटींच्या व्यवसायात मोठी वाढ केली असून ती सव्वादोनशे कोटी रुपये केली आहे. बँकिंग क्षेत्रात सहकारी नागरी व शासकीय बँकांची मोठी स्पर्धा असतानाही यशवंत बँकेने व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. ग्राहकांना, खातेदारांना व सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सर्व अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत. बँकेने स्वतःचे डाटा सेंटर यासह ग्राहकांना एटीएम, आरटीजीएस,फास्टट्रॅक ए डिजिटल सेवा दिल्या आहेत. अल्पावधीत यशवंत बँकेची मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगरीमधील ‘बँको ब्लू रिबन २०२०’ पुरस्कारासाठी यशवंत बँकेची निवड करण्यात आल्याचे सांगितले
उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संचालक सुभाष पाटील, एस. के. पाटील, नामदेव मुळे, संभाजी नंदीवाले, यशवंत शेलार, संग्राम भापकर, टी. एल. पाटील, उत्तम पाटील, पांडुरंग पाटील, सर्जेराव पाटील, कार्यकारी संचालक भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते
०२ एकनाथ पाटील