शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कोल्हापुरात ७४ वर्षीय उद्योगपती देताहेत बारावीची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:39 IST

कोल्हापूरातील बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर ७४ वर्षीय एक उद्योगपतीही आपल्या सुनेसोबत आले होते, अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी ते आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांसोबत परिक्षा केंद्रावर आली होती कारण, हे वृद्ध उद्योगपतीच बारावीची परीक्षा देण्यासाठी आले होते.

ठळक मुद्देकोल्हापूरात ७४ वर्षीय उद्योगपती देताहेत बारावीची परिक्षावार्धक्यातही पदवीसाठी मेहनत : कुटूंबिय देताहेत साथ

कोल्हापूर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. कोल्हापूरातील बारावीच्या एका परिक्षा केंद्रावर ७४ वर्षीय एक उद्योगपतीही आपल्या सुनेसोबत आले होते, अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी ते आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांसोबत परिक्षा केंद्रावर आली होती कारण, हे वृध्द उद्योगपतीच बारावीची परिक्षा देण्यासाठी आले होते. नापास झाल्यामुळे न खचता वार्धक्यातही परिक्षा देण्याची जिद्द बाळगणाऱ्या देशिंगे यांनी परिक्षेत नापास झाल्याने आत्महत्या करणाऱ्या विद्यार्र्थ्यासमोर आदर्श ठेवला आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षांना मोठे महत्व आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना घेउन संबंधित परिक्षा केंद्रांवर आले होते. गोखले कॉलेज येथील परिक्षा केंद्रावरही अनेक पालक आपल्या पाल्यांना घेउन आले होते. तेथे लक्ष्मीपुरी येथील रहिवाशी रविंद्र बापू देशिंगे हे ७४ वर्षीय उद्योगपतीही परिक्षा केंद्रावर आले होते. सोबत त्यांच्या सूनबाई होत्या.प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक नगरसेवक तौफिक मुल्लाणी हेही त्यांची कन्या कुलसूमसोबत या केंद्रावर आले होते, त्यांना उत्सुकता वाटली म्हणून चौकशी केली, तेव्हा देशिंगे हे त्यांच्या सूनबार्इंसाठी नव्हे तर ते स्वत:च बारावीची परिक्षा देण्यासाठी तेथे आले होते. देशिंंगे उत्तम उद्योगपती आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी बारावीची परिक्षा दिली होती, परंतु तीन विषय राहिल्याने ते या वयातही पुन्हा जिद्दीने पदवी मिळवण्यासाठी कशाचीही तमा न बाळगता परीक्षेस बसले आहेत. मुल्लाणी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

किरकोळ कारणावरुन आत्महत्या करणाऱ्यांनी देशिंगे आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नापास झाल्याचे दु:ख न करता जिद्दीने ते बारावीची पदवी मिळविण्यासाठी परिश्रम करत आहेत, हे प्रेरणादायी आहे. आयुष्य स्थिरस्थावर झाले असतानाही पदवी मिळवायचीच या जिद्दीने ते परिक्षा देत आहेत. त्यांना साथ देणाऱ्या कुटूंबियांचेही कौतुक करावे लागेल. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.तौफिक मुल्लाणी,नगरसेवक, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव,संचालक, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाkolhapurकोल्हापूर