गंगावेश तालमीतील मल्लाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:53+5:302021-04-05T04:20:53+5:30
कोल्हापूर : गंगावेश तालमीतील मल्ल लव्हाजी साळुंखे (वय २३) याला रविवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का बसला. त्याला उपचारासाठी अन्य मल्लांनी ...

गंगावेश तालमीतील मल्लाचा हृदयविकाराने मृत्यू
कोल्हापूर : गंगावेश तालमीतील मल्ल लव्हाजी साळुंखे (वय २३) याला रविवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का बसला. त्याला उपचारासाठी अन्य मल्लांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
लव्हाजी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बामणी गावचा असून गेल्या दोन वर्षांपासून शाहू विजयी गंगावेश तालमीमध्ये सराव करीत आहे. रविवारी सकाळी छातीत दुखू लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बामणीहून दोन वर्षांपूर्वी तो सरावासाठी कोल्हापूरला आला होता. रोजच्या प्रमाणे रविवारी सकाळी त्याने व्यायाम केला. मात्र, त्यानंतर त्याच्या छातीमध्ये दुखू लागले. तालमीतील इतर मल्लांनी तातडीने त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऐन उमेदीत नवोदीत मल्लावर काळाने घाला घातल्याने कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली.
फोटो : ०४०४२०२१-कोल-लव्हाजी साळुंखे (निधन)