लोखंडी रॉडच्या हल्ल्यात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST2021-06-09T04:31:24+5:302021-06-09T04:31:24+5:30

कोल्हापूर : दारूच्या नशेत एकमेकांकडे बघण्याच्या रागातून लोखंडी रॉडने मारहाण केल्याने एकजण गंभीर जखमी झाला. विजय भोला गोसावी (वय ...

Wounded in iron rod attack | लोखंडी रॉडच्या हल्ल्यात जखमी

लोखंडी रॉडच्या हल्ल्यात जखमी

कोल्हापूर : दारूच्या नशेत एकमेकांकडे बघण्याच्या रागातून लोखंडी रॉडने मारहाण केल्याने एकजण गंभीर जखमी झाला. विजय भोला गोसावी (वय ३८, रा. नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना सोमवारी टेंबलाईवाडीत मंदिर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयित नावे अशी : जमीर मुजावर (वय ३८), त्याचा मुलगा सोहेल मुजावर (दोघेही रा. नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय गोसावी व जमीर मुजावर हे मित्रासमवेत एकत्रित दारू पित बसले. त्यावेळी एकमेकाकडे बघण्याच्या कारणांवरून व पूर्ववैमनस्यातून दोघांत वादावादी व शिवीगाळचा प्रकार घडला. यावेळी जमीर मुजावर याने धावत जाऊन घरातून लोखंडी रॉड घेऊन आले, तर त्याचा मुलगा सोहेल मुजावर हाही हातात स्टिक घेऊन मारण्यासाठी आला. जमीरने लोखंडी रॉड विजय गोसावी याच्या डोक्यात मारून गंभीर त्याला जखमी केले. तर सोहेल हा हॉकी स्टिकचा प्रहार विजय यांच्यावर करत असतानाच तेथे असणारा मित्र राजू लटके याने स्टिक पकडली. या हल्ल्ल्यातील जखमी विजय गोसावी याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात लोहार पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wounded in iron rod attack