ग्रामविकास मंत्र्यांसाठी तरूणांचे दंडवत, गडहिंग्लजमध्ये 'महालक्ष्मी देवी'ला साकडे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 20:14 IST2020-09-22T20:11:49+5:302020-09-22T20:14:10+5:30
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी येथील आर.के.कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शहरातील महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले.

गडहिंग्लज येथे ग्राम विकास मंत्री यांच्यासाठी येथील महालक्ष्मी देवीला आर.के.कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे दंडवत घालून साकडे घालण्यात आले.
गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी येथील आर.के.कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शहरातील महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले.
शहरातील काळभैरी रोड ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दंडवत घातला. मंदिरात
मंत्री मुश्रीफ यांच्यासह जिल्हा कोरोनामुक्त व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश कोरवी, निखिल आजरी, राकेश कोरवी, उद्धव कोरवी, अमोल कोरवी, संजय कोरवी, अविनाश कोरवी, मनोहर बोबडे, करण लाखे, अंजनेय कुमार, अक्षय कोरवी, तम्मा बोरगावे, लखन गोंधळी, सुभाष कोड्याळे, बाबलू कांबळे, ओंकार चव्हाण, कैफ दड्डीकर, गजानन गायकवाड, अतुल बताटे, राजू कांबळे, सचिन बिलावर, जमाल शेख आदी उपस्थित होते.