संदीप आडनाईककोल्हापूर : वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर ही एक मोठी आणि कायमस्वरूपी मानवी वस्ती असलेले आणि ‘सेन्सस टाऊन’चे सर्व निकष पूर्ण करणारे शहर आहे. येथे अनेक मोठे गृहनिर्माण प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणासाठी बांधलेली विस्तृत यंत्रणा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर पोहोचली आहे.मुंबई आणि पुणे ही शहरे मेट्रोपोलिटीन झाली असली तरी कोल्हापूरने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. कुठल्याही राज्यातून येऊ दे, इथे आल्यावर मराठीत बोलावेच लागते, हे इथले वैशिष्ट्य. हे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापूरकडे लक्ष आहे. हवामान, दळणवळण, खाद्यसंस्कृती, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन, मेडिकल हब कोल्हापुरात आहे. आयटी कंपन्या आहेत, पण आयटीहबसाठीच्या पायाभूत सुविधा आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हे शहर मागे पडले आहे.
दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटक अशी विस्तीर्ण भौगोलिक स्थिती, मुंबईला जाणे दूर पडते, शिवाय सोयीस्कर नाही, म्हणून उत्तर कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातल्या लोकांसाठी कोल्हापूर हेच सर्वांत मोठे शहर आहे. कानडी लोकांसाठी तर कोल्हापूर म्हणजे मुंबईच आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज आणि बेळगाव ही कधीही न तुटणारी युती आहे.कोल्हापूरचा क्रमांक नववा राज्यात लोकसंख्येच्या बाबतीत कोल्हापूरचा क्रमांक नववा आहे. १९५० मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या १,३३,३६५ होती. गेल्या वर्षी कोल्हापूरमध्ये १२,४६० लोकसंख्या वाढली आहे, जी वार्षिक १.९ टक्के वाढ दाखवते. २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,८७६,००१ आहे. त्यापैकी १९,८०,६५८ पुरुष, तर १८,९५,३४३ महिला आहेत. २०११ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ८,४०,२४० कुटुंबे राहत होती. २०२५ मध्ये शहराची लोकसंख्या ६,६९,००८ इतकी आहे.
व्यक्तीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा येथे आहेत, नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. त्यामुळे हे शहर ‘सेन्सस टाऊन’चे सर्व निकष पूर्ण करते. -के. पी. खोत, अध्यक्ष, क्रीडाई. पाटील