शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

जागतिक वारसास्थळ सप्ताहाला मंगळवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:35 PM

कोल्हापूरची वारसास्थळे व संस्कृती लोकांसमोर आणण्यासाठी जागतिक वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज) सप्ताहाचे मंगळवार (दि. १९) ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, प्रदर्शन व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देजागतिक वारसास्थळ सप्ताहाला मंगळवारपासून सुरुवातसंस्कृतीवर आधारित विविध स्पर्धा, प्रदर्शन, कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूरची वारसास्थळे व संस्कृती लोकांसमोर आणण्यासाठी जागतिक वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज) सप्ताहाचे मंगळवार (दि. १९) ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, प्रदर्शन व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, हेरिटेज कॉँझर्व्हेशन कमिटी, क्रिडाई, रोटरी, इस्टिट्यूट आॅफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स, आदी संस्थांच्या सहकार्याने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूरची वारसास्थळे, संस्कृती लोकांसमोर आणून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ते पुढे म्हणाले, या सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील वारसास्थळे तसेच वैशिष्ट्ये, संस्कृती यांच्या माहितीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील वैशिष्ट्यांवर आधारित स्पर्धा, वारसास्थळ वास्तूबाबत छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन, जिल्ह्याची पारंपरिक पाककृती, खाद्यसंस्कृतीवर आधारित खाद्यमहोत्सव होणार आहे.

हेरिटेज वॉक हे सकाळी आठ ते १० व दुपारी चार ते सायंकाळी सहा असे दोन सत्रांत होणार आहे. हेरिटेज हंटसाठी रेसिडेन्सी क्लबसह १० ठिकाणे निवडण्यात आली असून, त्यासाठी क्लू देण्यात आले आहेत. त्यानुसार ही १० ठिकाणे पूर्ण करणाऱ्याला विजेता घोषित करण्यात येईल.

याबरोबरच २५ नोव्हेंबरला जिल्ह्यातील वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रवी माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

खासगी ११ वारसास्थळांचाही समावेशजिल्ह्यात एकूण तीन हजार वारसास्थळे असून, त्यांतील ७४ ठिकाणांची निवड या सप्ताहासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये ११ खासगी वारसास्थळांचाही समावेश करण्यात आला असून, संबंधितांशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. सप्ताहानिमित्त शाहू स्मारक भवन येथे ४० मिनिटांची वारसास्थळांसंदर्भातील चित्रफीतही दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, मर्दानी खेळ व पोवाड्यांचेही सादरीकरण होईल, असे अमरजा निंबाळकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर