Work through the coordination of office-bearers: | पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या समन्वयातूनच जिल्हा परिषदेचे काम

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते शाहू सभागृहात झाले.

ठळक मुद्देपदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या समन्वयातूनच जिल्हा परिषदेचे कामजिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दिली ग्वाही, दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा लौकिक कायम राहील असेच कार्य अपेक्षित आहे. आतापर्यंत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातूनच कामकाज होत आले आहे, पुढेही होत राहील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायमच सकारात्मक राहू, असा शब्दही पाटील यांनी दिला.

जिल्हा परिषद कर्मचारी यांना सेवाविषयक लाभांची माहिती असणारी दिनदर्शिका काढण्यात आली आहे. तिचे प्रकाशन अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. शाहू सभागृहात झालेल्या या समारंभात कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिनदर्शिकेचा उपक्रम मार्गदर्शक आहे. येथून पुढेही जिल्हा परिषदेच्या अशा उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय राहू, असे सांगितले. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष महावीर सोळांकुरे यांनी प्रास्ताविक केले. नामदेव रेपे यांनी आभार मानले.

यावेळी शिक्षण सभापती प्रवीण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विनय पाटील, भगवान पाटील यांच्यासह मुख्य वित्त लेखाधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांच्यासह संघटनांचे प्रतिनिधी के. आर. किरूळकर, विजय टिपुगडे, सचिन मगर, रवींद्र गस्ते, सचिन जाधव, एफ. एम. फरास, बी. डी.पाटील, किरण मगदूम, संगीता गुजर, मनीषा पालेकर, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Work through the coordination of office-bearers:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.