शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
5
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
7
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
8
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
9
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
10
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
11
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
12
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
13
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
14
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
16
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
17
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
18
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
19
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
20
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
Daily Top 2Weekly Top 5

कागल-सातारा सहापदरीकरण दिवाळीनंतरच, अदानी कन्स्ट्रक्शनला मिळालं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:08 IST

गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते.

नसिम सनदीकोल्हापूर : कागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामाच्या मागे लागलेले निविदांचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेईना झाले आहे. दोन टप्प्यात होत असलेल्या कामासाठी दोन पॅकेजच्या निविदा मार्चमध्ये निघाल्या, त्यातील १४९१ कोटीच्या पहिल्या पॅकेजची निविदा रद्द करून फेरनिविदा ७ जुलैला निघणार आहे. १७४९.८० कोटीच्या दुसऱ्या पॅकेजी निविदा उघडली गेली आहे, अदानी कन्स्ट्रक्शनला काम मिळाले आहे, पण मंजुरीची प्रदीर्घ प्रक्रिया पाहता सहापदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला दिवाळीनंतरचाच मुहूर्त शाेधावा लागणार आहे.राष्ट्रीय महामार्गाच्याकागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामांना मंजुरी मिळून, ३२४०.८ कोटीच्या निधीची तरतूद करुन दोन वर्षे होऊन गेले तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते.गेले दीड वर्ष हेच सुरू आहे. मार्चमध्ये काढण्यात आलेल्या निविदेत पहिल्या पॅकेजसाठी आयजीएम या एकमेव कंपनीची निविदा आली होती, त्यामुळे ही प्रक्रिया जैसे थे ठेवण्यात आली. याचवेळी दुसऱ्या पॅकेजसाठी मात्र अदानी कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर होऊन त्यांची पुढील मंजुरी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. दोन टप्प्यातील या कामाच्या या दोन तऱ्हा आणि पावसाळा सुरु असल्याचे पाहता सहापदरीकरणाचे काम नव्या वर्षापर्यंत रेंगाळणार आहे.

एपीसी धोरणानुसार होणार रस्ताबांधा वापरा हस्तांतर या पध्दतीने रस्ते करण्याचे केंद्र सरकारचे धोरण होते, पण आता केंद्र सरकारने त्यात बदल केला आहे. एपीसी या धोरणानुसार स्वत:च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कागल ते सातारा सहापदरीकरणाचे काम करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी प्रकल्प किंमत निश्चित करून त्याप्रमाणे निविदा प्रक्रिया सुरू होत आहे.

राजपत्र प्रसिध्द पण अधिग्रहण नाही

शेंद्री ते पेठ नाका येथील जमिनीचे अधिग्रहण झाले, पण त्याचवेळी पेठ नाका ते कागलपर्यंत अजून अधिग्रहण झालेले नाही. सुनावण्या, हरकती घेऊन जमिनीबाबत राजपत्र प्रसिध्द केले आहे. पण अजून मोबदला, जागेचे रेखांकन असे काहीही झालेले नाही.

  • पहिले पॅकेज : १४९१ कोटी
  • अंतर : ६६ किलोमीटर
  • ठिकाण: कागल ते पेठ नाका

 

  • दुसरे पॅकेज: १७४९.८० कोटी
  • अंतर: ६७ किलोमीटर
  • ठिकाण: पेठ नाका ते शेंद्रे नाका
  • ठेकेदार : अदानी कन्स्ट्रक्शन कंपनी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गSatara areaसातारा परिसरkagal-acकागल