CoronaVirus Lockdown : घरात बंदिस्त लोकांना दिसला ऊन-पावसाचा अनोखा चमत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:56 IST2020-04-11T20:52:39+5:302020-04-11T20:56:44+5:30
सोसाट्याचा वारा ... सर्वत्र वादळ ... संपूर्ण आकाश ढगांनी भरून आले ... आणि सर्वत्र काळसर ढगांनी दाटल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले. आणि गेल्या चौदा दिवसापासून घरात बंदिस्त व उष्म्याने त्रस्त असणाऱ्या लोकांना नजरेसमोर निसर्गाचा नजराना दिसला. तो पाहून लोकांना निसर्गाची किमया डोळ्यात साठवता आली.

CoronaVirus Lockdown : घरात बंदिस्त लोकांना दिसला ऊन-पावसाचा अनोखा चमत्कार
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : सोसाट्याचा वारा ... सर्वत्र वादळ ... संपूर्ण आकाश ढगांनी भरून आले ... आणि सर्वत्र काळसर ढगांनी दाटल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले. आणि गेल्या चौदा दिवसापासून घरात बंदिस्त व उष्म्याने त्रस्त असणाऱ्या लोकांना नजरेसमोर निसर्गाचा नजराना दिसला. तो पाहून लोकांना निसर्गाची किमया डोळ्यात साठवता आली.
गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता धामोड परिसरात पाऊस पडण्याअगोदर वातावरण तयार झाले होते. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी छोटया - मोठया गावांनी सीमा लॉक केल्याने लोकांनी स्वःताला घरातच कोंडून घेतले आहे. घरात प्रचंड उष्मा, बाहेर कोरोना अशा अवस्थेत सापडलेल्या लोकांना हा पाऊस गारवा निर्माण करणारा ठरला.
पाऊस पडण्याअगोदर धामोड परिसरात निर्माण झालेले वातावरण लोकांना पहावयास मिळाले. तो अद्भूत चमत्कार एक अविस्मरणीय पर्वणी होती. धामोड, कुरणेवाडी, लाडवाडी, नऊ नंबर परिसरातून पाऊस न्याहाळत असताना समोर लाडवाडी-कुरणेवाडी दरम्यानच्या तीन टेकड्यावर ढगाआढून पडलेल्या सुर्यकिरणांनी लोकांचे लक्ष वेधले.