इचलकरंजी : इचलकरंजी-सुळकूड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी चार महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषणास गांधी पुतळ्याजवळ प्रारंभ केला. यामध्ये सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे यांचा समावेश आहे.शहरासाठी सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यासाठी इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समितीने जनआंदोलनही सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपोषण, साखळी आंदोलन यांसारखी आंदोलने हाती घेण्यात आली आहेत. प्रांत कार्यालयासमोर सोमवारी (दि. १२) रमेश पाटील यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर सोमवारपासून आम्ही सावित्रीच्या लेकी या महिला गटातील महिलांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.तत्पूर्वी सकाळी शिवतीर्थावर येऊन शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सकाळी उपोषणस्थळी प्रताप होगाडे, मदन कारंडे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, सागर चाळके, पुंडलिक जाधव, जावेद मोमीन, नितीन जांभळे, विकास चौगुले, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, माधुरी सातपुते, रिटा रॉड्रिग्युस, आदींनी उपस्थिती लावली.
Kolhapur: सुळकूड पाणी योजनेसाठी इचलकरंजीत महिलांचे आमरण उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 13:19 IST