शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महिलांकडून फायनान्स कर्मचाऱ्यांना चोप, फायनान्सच्या पाचजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:48 IST

इचलकरंजी : दत्तनगर-कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका महिला बचत गटाकडील थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास आलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या ...

इचलकरंजी : दत्तनगर-कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका महिला बचत गटाकडील थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास आलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांची भागातील महिलांनी धुलाई केली. याप्रकरणी रेश्मा अर्शद मणेर (रा. दत्तनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा रवी शिंदे, उद्धप्पा मारुती मुदगलवार, प्रवीण पुंडलिक जाधव (तिघे रा. निपाणी-कर्नाटक), जावेद अजहर मकानदार व परवीन अल्लाउद्दीन हैदर (दोघे रा. कबनूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या फायनान्स कर्मचाऱ्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी: भारत फायनान्स कंपनीचे काही कर्मचारी कबनूर येथील दत्तनगर परिसरात बचत गटाचा एक हप्ता थकल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बचत गटातील महिलांच्या दारात जाऊन वसुलीचा तगादा लावत होते. गुरुवारी (दि.२) सकाळपासून रात्रीपर्यंत वसुलीसाठी महिलांच्या दारात थांबत होते. याबाबत काही महिलांनी दिव्या मगदूम यांना माहिती दिली.

त्या घटनास्थळी आल्या आणि फायनान्स कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत असताना त्या कर्मचारी व दोन महिलांनी उद्धटपणे उत्तरे दिली. त्यामुळे मगदूम यांच्या समर्थक महिलांनी त्या कर्मचाऱ्यांची धुलाई केली. या घटनेने दत्तनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस