शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराची महिला पोलिसांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST

इचलकरंजी : मास्क न लावता मोटारसायकलवरून विनाकारण फिरणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कारवाई करताना महिला पोलिसाबरोबर अरेरावी केली. त्यामुळे त्याच्यावर ...

इचलकरंजी : मास्क न लावता मोटारसायकलवरून विनाकारण फिरणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कारवाई करताना महिला पोलिसाबरोबर अरेरावी केली. त्यामुळे त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. महेश अप्पासाहेब माळी (रा. लिगाडे मळा, जवाहरनगर), असे त्याचे नाव असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, त्याची वैद्यकीय तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

संचारबंदी असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तरीही काही तरुणमंडळी व नागरिक शहरात बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत कडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस स्टेशन रोडवर बंदोबस्तासाठी असताना महेश माळी याला मोटारसायकलवरून विनामास्क फिरत असताना पकडले. त्याला महिला पोलिसांनी मास्क न घालता विनाकारण कशासाठी फिरत आहेस, असे विचारले. यावेळी त्याने महिला पोलिसांबरोबर हुज्जत घालत वर्दी उतरवूनच दाखवितो, अशी धमकी दिली. याची माहिती मिळताच शहरातील आजी- माजी नगरसेवकांसह त्याच्या समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.