शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पैशांच्या वसुलीपोटी महिलेवर बलात्कार; अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:35 IST

कोल्हापूर : दरमहा १० टक्के व्याजाने दिलेल्या ७० हजार रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकार रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. ...

कोल्हापूर : दरमहा १० टक्के व्याजाने दिलेल्या ७० हजार रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकार रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी) याने महिलेवर बलात्कार केला. दारू पाजून काढलेले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१४ ते जून २०२४ या काळात घडला. पीडित महिलेने फिर्याद देताच शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. २४) खासगी सावकार जानकर याला अटक केली.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने कौटुंबीक अडचणीतून रामा जानकर या खासगी सावकाराकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मुद्दल आणि दरमहा १० टक्के व्याजाने हप्ते परत करायचे होते. कालांतराने कर्जाचे हप्ते थकल्याने जानकर याने वसुलीसाठी तगादा लावला. वेळेत हप्ते देणार नसल्यास शरीरसंबंध ठेवायला लागतील, असे सांगून वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. दारू पाजून मोबाइलवर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. थकलेल्या कर्जाची रक्कम तीन लाख रुपये असल्याचे सांगून तिचे राहते घर स्वत:च्या मर्जीने विकत असल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने जानकर याला अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस