वाघवेत शेतात काम करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:38 IST2019-07-18T17:32:25+5:302019-07-18T17:38:52+5:30

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ...

The woman has a snake bite while working in the tigress field | वाघवेत शेतात काम करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

वाघवेत शेतात काम करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

ठळक मुद्देवाघवेत शेतात काम करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. कांचन दत्तात्रय सातपुते (वय ४२, रा. वाघवे) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

कांचन सातपुते ही महिला वाघवे गावातीलच चव्हाणवाडी नावाच्या शेतात काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. त्यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांच्या मुलाने त्यांना तातडीने खासगी वाहनातून सकाळी नऊ वा. सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 

 

Web Title: The woman has a snake bite while working in the tigress field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.