शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:32 IST

सुखाचे क्षण अनुभवण्याची वेळ आली होती. मात्र, नियतीने घाला घातला

कोल्हापूर : मुलाच्या दुचाकीवर मागे बसून महापालिकेत जाताना वाऱ्याने छत्री उलटी होताच तोल जाऊन पडल्याने मीना दिलीपराव मगदूम (वय ५९, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. त्या महापालिकेत आस्थापना विभागात शिपाई पदावर कार्यरत होत्या. ही दुर्घटना मंगळवारी (दि. १) सकाळी दहाच्या सुमारास महाद्वार रोडवर घडली.आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. आता नातवंडांसोबत खेळण्यापूर्वीच काळाने घाला घातला. निवृत्तीला वर्षभराचा कालावधी उरला असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मगदूम यांच्या पतीचे २५ वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. ते महापालिकेत पवडी विभागात होते. मीना यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी दोन मुले आणि मुलीचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा सोनार काम करतो. लहान मोबाइल दुकानात काम करतो. मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून दिले. दीड महिन्यापूर्वीच लहान मुलाचे लग्न झाले.वर्षभरात त्या निवृत्त होणार होत्या. निवृत्तीनंतर नातवंडांसोबत आयुष्याची संध्याकाळ निवांत घालवायचा विचार त्यांनी अनेकदा नातेवाइकांकडे बोलून दाखवला होता; पण काळाने अचानक घाला घातल्याने सुख उपभोगण्यापूर्वीच त्यांची एक्झिट झाली.

नाका-तोंडातून आले रक्तलहान मुलगा त्यांना रोज महापालिकेत सोडून पुढे मोबाइल दुकानात जात होता. मंगळवारी सकाळी माय-लेक दोघे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून बाहेर पडले. पावसाची रिमझिम सुरू असल्याने मीना यांनी डोक्यावर छत्री धरली होती. वाऱ्याच्या झोतात छत्री उलटी झाल्याने त्या तोल जाऊन पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाका-तोंडातून रक्त आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मुलाने फ्लॅट घेतल्याचे कौतुकत्यांच्या मुलाने संभाजीनगर परिसरात नुकताच नवीन फ्लॅट घेतला आहे. त्या दोन दिवस मुलांसोबत फ्लॅटमध्ये राहून आल्या. मुलांच्या यशाचे त्यांना मोठे कौतुक होते. आयुष्यभर केलेल्या दगदगीनंतर आता सुखाचे क्षण अनुभवण्याची वेळ आली होती. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घातला.