शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय लग्नातील साक्षीदार मौलवीस मारहाण, कोल्हापुरातील घटना; काही काळ तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:05 IST

माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मौलवीस ताब्यात घेतले

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील तरुण आणि आटपाडी (जि. सांगली) येथील तरुणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला असून, त्या विवाहासाठी रजिस्टर कार्यालयात साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेल्या मौलवीस मुलीच्या नातेवाइकांनी मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. १८) दुपारी शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ घडला. यावेळी तरुणांची गर्दी झाल्याने परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी येथील तरुणी आणि जयसिंगपूर येथील तरुणाने १५ दिवसांपूर्वी कोल्हापुरात रजिस्टर लग्न केले. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. लग्नासाठी कोल्हापुरातील एक मौलवी साक्षीदार होते, अशी माहिती तरुणीच्या नातेवाइकांना मिळाली होती. त्यानुसार तरुणीचा भाऊ काही तरुणांसह शुक्रवार पेठेतील मौलवीच्या घरी पोहोचला. त्याने जाब विचारत मौलवीस मारहाण केली. ११२ कॉलवरून याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मौलवीस ताब्यात घेतले. चौकशीअंती संबंधित लग्न सहमतीने झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला सोडून दिले.