‘गोकुळ’साठी आजपासून माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:12+5:302021-04-06T04:23:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी आज, मंगळवारपासून उमेदवारी अर्जाच्या माघारीस सुरुवात होत आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची ...

‘गोकुळ’साठी आजपासून माघार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी आज, मंगळवारपासून उमेदवारी अर्जाच्या माघारीस सुरुवात होत आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून, २२ एप्रिलला चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले होते. त्याची सोमवारी छाननी झाली असून, आजपासून माघारीस सुरुवात झाली आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुक किंवा सूचक यांना उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. २२ एप्रिलला चिन्हे वाटप, तर २ मे रोजी मतदान होणार आहे. ४ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
माघारीसाठी नऊ दिवसच
माघार ६ ते २० एप्रिल दरम्यान होणार आहे. हा कालावधीत मोठा वाटत असला तरी त्यातील सहा दिवस सुट्या आहेत. १०, ११ व १७, १८ एप्रिलला शनिवार व रविवार, तर १३ एप्रिलला गुढीपाडवा, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती असल्याने कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे माघारीसाठी नऊच दिवस मिळणार आहेत.