शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोरोना काळात शिक्षकांनी दिवसाचा पगार दिला; सव्वा कोटी पडून, पॅथॉलॉजी लॅब कागदावरच 

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2025 13:20 IST

महापालिकेची उदासीनता

समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक भान जपत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी एक दिवसाचा पगार आपत्कालीन निधीसाठी दिला. त्यातून येथील महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयाच्यावर पॅथॉलॉजी लॅब उभारण्याचा निर्णय झाला. परंतु गेली साडेतीन वर्षे हा एक कोटी २० लाख रुपयांचा निधी पडून असून, ही लॅब कागदावरच आहे. याबाबत गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीआधी आमदार जयंत आसगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर यासाठी बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु, ती बैठकीही झालेली नाही.पाच वर्षांपूर्वीच्या कोरोना काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. पहिल्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी दारे बंद करून घेतली होती. दुसऱ्या लाटेत मात्र ती तातडीने उघडण्यात आली. याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन निधीसाठी घेतला होता.दुसऱ्या लाटेत तर मोठ्या प्रमाणावर रुग्णांना जीव गमवावा लागला आणि त्यावेळच्या महागड्या चाचण्यांनी अनेकांचे कंबरडे मोडले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संंघटनांची बैठक घेऊन एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयाच्या वर प्रयोगशाळा उभारून या ठिकाणी किफायतशीर दरात विविध आरोग्य चाचण्यांची सुविधा देण्याचे नियोजन होते. परंतु, कोरोनाची तिसरी लाट संपली आणि त्यानंतर या निधीचाही विषय मागे पडला.

महापालिकेकडे वर्गहा निधी जिल्हा आपत्कालीन विभागाच्या खात्यावर पडून होता. महापालिकेने तो गतवर्षी मागवून घेतला. हा निधी आणि महापालिका शिक्षकांचा एक दिवसाचा पगार अशी रक्कम एक कोटी २० लाख रुपये होते. इतका निधी ज्यासाठी गोळा केला ते रोगनिदान केंद्र किंवा आरोग्य चाचण्यांचे सेंटर किंवा पॅथॉलॉजी लॅब मात्र अस्तित्वात आलेली नाही.

कोरोनानंतरच्या भविष्यकाळात सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या करता याव्यात यासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी एक दिवसाचा पगार दिला होता. ज्या कारणासाठी हा पगार दिला, त्याची लवकरात लवकर पूर्तता व्हावी हीच आता अपेक्षा आहे. - प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना