शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

नेमबाज ‘तेजस्विनी’ला हवा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:21 AM

कोल्हापूर : स्वत:ची रायफल नसतानाही जिद्दीच्या जोरावर कसबा बावडा येथील नवोदित नेमबाज तेजस्विनी आरगे हिने राष्ट्रीय वरिष्ठ नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

ठळक मुद्देमदतीचा हात दिल्यास पुन्हा एकदा कोल्हापूरची दुसरी विक्रमवीर आंतरराष्ट्रीय नेमबाज तयार होईल.

कोल्हापूर : स्वत:ची रायफल नसतानाही जिद्दीच्या जोरावर कसबा बावडा येथील नवोदित नेमबाज तेजस्विनी आरगे हिने राष्ट्रीय वरिष्ठ नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तिला राष्ट्रकुल, आशियाई ते आॅलिम्पिकपर्यंत मजल मारायची आहे. मात्र, आर्थिक पाठबळ नसल्याने ती स्वत:ची रायफल घेऊ शकत नाही. या ‘तेजस्विनी’ला मदतीचा हात दिल्यास पुन्हा एकदा कोल्हापूरची दुसरी विक्रमवीर आंतरराष्ट्रीय नेमबाज तयार होईल.

अत्यंत खडतर परिस्थितीतून तेजस्विनी आरगेने आपली आवड जोपासली. नेमबाजीची साधनं नाहीत, खर्चाला पैसे नाहीत, आईवडिलांचे तुटपुंजे उत्पन्न अशा परिस्थितीतही तिने नेमबाजीचे प्रशिक्षण मात्र जिद्दीने घेतले असून, गेल्या तीन वर्षांत तिने राष्ट्रीय पातळीपर्यंत चमक दाखविली. स्वत:ची रायफल नसताना भाडेतत्त्वावर रायफल घेऊन तिने नेमबाजी स्पर्धा गाजविल्या आहेत.

कसबा बावडा येथील आरगे कुटुंबीयांची परिस्थिती अगदीच बेताची आहे. वडील तातोबा आरगे हे रिक्षा व्यावसायिक, तर आई सुनीता या खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात.तेजस्विनीने महाविद्यालयीन शिक्षण महावीर महाविद्यालयातून घेतले, तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण ती डी. आर. के. कॉमर्स कॉलेज येथे घेत आहे. एन.सी.सी.मधून नेमबाजीची आवड निर्माण झालेली तेजस्विनी आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका हवालदार व रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. नियमित सरावाची फीही भरता येत नाही; म्हणून तिनं इतरत्र नोकरी करून आपला छंद जोपासला आहे.तिला लक्ष्य अचूक भेदता येते. मात्र, स्वत:ची रायफल नसल्याने तिला अनेकदा दुसºयांवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे रायफलची गरज आहे. रायफलची किंमतही अडीच लाख इतकी असल्याने ही बाब तिच्या व कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर आहे.

नेमबाजीतील दुसरी विक्रमवीर तेजस्विनी घडवायची असल्यास तिला रायफल मिळणे गरजेचे आहे. तिला रायफल खरेदीसाठी भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांनी २५, तर संजय पवार-वाईकर यांनी ११ हजारांची मदत दिलीआहे.उसनवारी करीत विविध स्पर्धांत सहभागतिने २०१३ साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय एन. सी. सी. नेमबाजी स्पर्धेत ‘सांघिक’मध्ये दोन सुवर्ण व वैयक्तिक रौप्यपदक पटकावले. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने अनेकदा उधार-उसनवार करीत तिने २०१५ ला वाराणसी, २०१६ ला केरळ, नाशिक, मुंबई, अमृतसर, नवी दिल्ली यांसह विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. काही स्पर्धांमध्ये विशेष चमक दाखविली. नुकत्याच केरळ येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतही तिचे पदक थोडक्यात हुकले.