शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील काही 'शूटिंग रेंज'चे होणार खासगीकरण?, नेमका 'नेम' कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:35 IST

नेमका नेम कोणाचा? : क्रीडाप्रेमींची ही रेंज सरकारीच राहावी अशी भूमिका

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज झाली. पुणे, मुंबई, नवी दिल्लीला सरावासाठी जाणाऱ्या नेमबाजांचा खर्च वाचला. मात्र, या शूटिंग रेंजमधील काही लेन सुरुवातीला खासगी संस्थेला दिल्या जाणार असल्याची हालचाल सुरू असल्याने सर्वसामान्य नेमबाजपटूंना पूर्णक्षमतेने सरावाला संधी मिळणार नाही. त्यामुळे या शूटिंग रेंजवर कोणाचा नेम आहे, असा आरोप खेळाडूंकडून होऊ लागला आहे.सध्या चालू असलेल्या शूटिंग रेंजमधील शुल्क सर्वसामान्य नेमबाजपटूंना परवडणारे आहे. मात्र, खासगीकरण झाल्यास नवनवीन सोयींच्या नावाखाली भविष्यात शुल्कात अनियमित वाढ होऊन त्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. सध्या १० मीटरमधील २७ पैकी ९ लेन, २५ मीटरमधील ८ पैकी २ लेन सुरू आहेत. तर ५० मीटरमधील १३ पैकी १० चालू आहेत. या रेंजमधील लेन खासगी अकॅडमीस दिल्यास नुकसान सोसावे लागणार असल्याचा आरोप नेमबाजपटूंनी केला आहे. त्यामुळे कोणाच्या दबावाखाली निर्णय घेऊन लेन अकॅडमीला देऊ नये, अशी खेळाडूंची मागणी आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूंकडून पाठपुरावासर्वसामान्य कुटुंबातील खेळाडू आपल्यासारखे नेमबाज घडावेत, या उद्देशाने ऑलिम्पियन आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आदींनी सातत्याने शूटिंग रेंजसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही राज्य सरकारची रेंज सरकारच्याच मालकीची राहावी, असा क्रीडाप्रेमींचा आग्रह आहे.

खासगीकरण करू नका : सतेज पाटीलछत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलमध्ये नेमबाजीचा सराव करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी असतात. ही शूटिंग रेंज सर्वसामान्य घरातील खेळाडूंना परवडणारी आहे. त्यामुळे या रेंजचे खासगीकरण करू नका, अशी विनंती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे २८ ऑगस्ट केली. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे समजते. परंतु या विषयांवर पालकमंत्रीही फारसे काही बोलत नाहीत.

काही खेळाडूंनी शूटिंग रेंजचे खासगीकरण करत आहेत, असा अपप्रचार सुरू केला आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. येत्या ५ डिसेंबरला त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. त्यात याप्रकरणी चर्चा होऊन वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल. अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. - सुहास पाटील, क्रीडा उपसंचालक, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur sports complex shooting range privatization sparks controversy; whose aim?

Web Summary : Kolhapur's shooting range privatization plans raise concerns for affordable access. Players fear increased costs, limiting opportunities. Officials deny decisions, promising a meeting to address concerns.