शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

केएमटीमध्ये धावणार पण... फक्त २२ प्रवाशांनाच घेऊनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 11:06 AM

  कोल्हापूर : केएमटी बस तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर आज, सोमवारपासून धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू राहणार आहे. प्रारंभी आठ ...

ठळक मुद्देप्रारंभी आठ मार्गावर बससेवा --सव्वादोन महिन्यांनी ‘आजपासून धावणार६० वर्षांवरील ज्येष्ठ व १० वर्षांखालील लहान मुलांना प्रवेश नाही

 कोल्हापूर : केएमटी बस तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर आज, सोमवारपासून धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू राहणार आहे. प्रारंभी आठ बसमार्गांवर सेवा देण्यात येणार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद केला आहे. पहिल्या टप्प्यात १० बस सेवेत असणार आहेत, अशी माहिती परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये के.एम.टी.ची बससेवा २४ मार्चपासून बंद करण्यात आली होती. सर्वपक्षीय कृती समिती, प्रवासी यांनी बससेवा सुरू करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आज, सोमवारपासून बससेवेला सशर्त परवानगी दिली आहे. याचबरोबर चालक, वाहकांना कामावर असताना हँडग्लोव्हज व मास्क बंधनकारक केले आहेत. तिकीट देण्यापूर्वी वाहकाकडून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर देण्यात येईल. किमान प्रवासी उपलब्ध झाल्यास बस सोडण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील बससेवेचे मार्गशाहू मैदान ते मार्केट यार्ड, शाहू मैदान ते विवेकानंद कॉलेजमार्गे शुगर मिल, गंगावेश ते एस.टी. स्टँड, छत्रपती शिवाजी चौक ते कळंबा, छत्रपती शिवाजी चौक ते क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, छत्रपती शिवाजी चौक ते बोंद्रेनगर, छत्रपती शिवाजी चौक ते जरगनगरमार्गे आर.के.नगर, गणपती मंदिर व छत्रपती शिवाजी चौक ते राजारामपुरीमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर

२२ प्रवाशांना प्रवेशसर्व बसेसचे प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक बसमधून कमाल २२ प्रवाशांनाच प्रवास करता येईल. प्रवाशांना बसमध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.

सातनंतर बस राहणार बंदआठ मार्गांवर एकूण १० बसेसद्वारे सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर बससेवा बंद असणार आहे.

 

टॅग्स :Bus Driverबसचालकkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका