शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Sugarcane Rate: ऊस दराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत धुराडी पेटू देणार नाही, राजू शेट्टींनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने किती रुपये दर जाहीर केला.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : मागील हंगामातील प्रतिटन दोनशे रुपयांसह एफआरपीचे पैसे थकवलेल्या आठ कारखाने व चालू हंगामातील एफआरपीपेक्षा कमी उचल देऊन हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. एकाही कारखान्याचे धुराडे आजपासून पेटू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. शेट्टी म्हणाले, गेल्या हंगामात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला होता. त्यानुसार किती कारखान्यांनी ५० व १०० रुपये दिले. ऊस तोडणी-ओढणीमध्ये मनमानी कपात करून फसव्या एफआरपीतून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. एकाच तालुक्यातील तुटलेल्या उसाचे गाळप करणाऱ्या दोन कारखान्यांची एफआरपी वेगळी कशी? ही मखलाशी खपवून घेणार नसून कायद्यानुसार पैसे द्या अन्यथा गाठ शेतकऱ्यांशी आहे.

वाचा : तोडगा निघालाच नाही; नेमका तिढा काय?, बैठकीत काय झालं..वाचा; गुरुवारी पालकमंत्री घेणार बैठकमागील हंगामातील एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर काय कारवाई केली? अशी विचारणा करत आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना गाळप परवाना दिलाच कसा? तातडीने हे कारखाने बंद करा.दरम्यान, याबाबत गुरुवारी (दि. ६) पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत ऊस दराबाबत बैठक आयोजित केल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

अध्यक्षांना कमीपणा वाटतोय का?बैठकीला कारखान्यांचे अध्यक्ष का आले नाहीत..? यावर हरकत घेत शेट्टी म्हणाले, कार्यकारी संचालक निर्णय घेणार आहेत का? बैठकीत येऊन शेतकऱ्यांना हिशोब सांगायला कारखान्याच्या अध्यक्षांना कमीपणा वाटतोय का..?मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावाऊस दराबाबत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा बुधवारी त्यांना कोल्हापुरात विचारू, असेही शेट्टी यांनी सांगितले.कारखान्यांची एफआरपी व जाहीर केलेली उचल प्रतिटन...

कारखाना एफआरपी (रुपये) पहिली उचल (रुपये) फरक
बिद्री ३५५२ ३४५२ १००
भोगावती ३६५२ ३४०० २५२
कुंभी ३५५८ ३५०० ५८
दालमिया ३६४२ ३५२५ १४७
शाहू ३३८० ३४०० २० जास्त
मंडलिक ३४१० ३४१० -
दत्त शिरोळ ३३७७ ३४०० २३ जास्त
पंचगंगा ३५१८ ३५१८ -
शरद ३२३६ अद्याप जाहीर नाही -
डी. वाय. पाटील ३३२५ ३४०० -
गायकवाड ३२७५ अद्याप जाहीर नाही -
गुरुदत्त ३२५० ३४०० -
घोरपडे ३३६९ ३४०० -
नलवडे ३१०० अद्याप जाहीर नाही -
अथणी तांबाळे ३०८० ३४०० -

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetti warns: No sugarcane crushing until rate issue resolved.

Web Summary : Raju Shetti warns factories against starting crushing until pending sugarcane payments are cleared and fair rates are decided. He demanded action against factories violating FRP norms, threatening protests. A meeting with the Guardian Minister is scheduled to discuss the issue.