शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला ग्रीन सिग्नल मिळणार का?, 'कोकण रेल्वे'ची बुधवारी गोव्यात होणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 1:15 PM

रो रो सेवा सुरु करण्याची मागणी

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नियोजित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन समितीची उद्या बुधवारी गोव्यात बैठक होणार असून यात या रेल्वे मार्गाचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन सल्लागार समितीचे सदस्य खासदार धनंजय महाडिक व सदस्य ललित गांधी यांनी हा विषय अजेंड्यावर आणला आहे. कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात मंजूरी देण्यात आली होती. १०७ किमीच्या या मार्गाचे दोनवेळा सर्व्हक्षण करण्यात आले. मात्र, पुढे यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने हा मार्ग अद्यापही कागदावरच राहिला आहे. या रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी चढउतार असल्याने पुन्हा यातील २७ कि.मीचे फेरसर्व्हक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. पण पुढे यावर काहीच झालेले नाही. उद्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत हा विषय प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे.

रो रो सेवा सुरु करण्याची मागणीकोकणातील आंबा व तत्समवर्गीय फळे वाहतूकीसाठी कोकण ते मुंबई या मार्गावर रो रो सेवा सुरु करा अशी मागणी ललित गांधी यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासह प्रवाशांसाठी अद्यायवत सुविधा, पार्सल बुकिंग या मागण्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

कोकण व दक्षिण महाराष्ट्राच्या विकासासाठी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग तातडीने होणे गरजेचे आहे. उद्याच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून हा मार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मी प्रयत्नशील आहे. - ललित गांधी, सदस्य, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन सल्लागार समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे