कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे होमवर्क चांगले झाले होते. मागील वेळी झालेल्या चुकाही सरकारने दुरुस्त केल्या होत्या. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली. तरीही मग, सरकारने जानेवारीतील पुढची तारीख का मागितली, असा मला प्रश्न पडला आहे. त्याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.मराठा आरक्षणाबाबत बुधवारी पाचसदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. त्यात या आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवली आहे. त्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता शेवटची सुनावणी होणार आहे. त्यासाठी होमवर्क करून अहवाल द्यावा. हो किंवा नाही असा एकदा निकाल लागू दे. आम्ही किती दिवस वाट पाहायची? असे खासदार संभाजीराजे म्हणाले.ह्यसुपर न्यूमररीह्णबाबत निर्णय घ्यावाह्यसुपर न्यूमररीह्ण पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकी, आदी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याचा पर्याय मी राज्य सरकारसमोर मांडला आहे. त्याचा विचार करून सरकारने लवकर निर्णय घ्यावा, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली? : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 10:55 IST
Maratha Reservation, Sambhaji Raje Chhatrapati, Uddhav Thackeray, kolhapur मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे होमवर्क चांगले झाले होते. मागील वेळी झालेल्या चुकाही सरकारने दुरुस्त केल्या होत्या. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली. तरीही मग, सरकारने जानेवारीतील पुढची तारीख का मागितली, असा मला प्रश्न पडला आहे. त्याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली? : संभाजीराजे
ठळक मुद्देमराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली? : संभाजीराजेसरकारने स्पष्टीकरण द्यावे : संभाजीराजे