शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ठेका कुणाचा, शिपेकर कोण?

By admin | Updated: December 2, 2014 00:46 IST

सीपीआर कर्मचारी मारहाण प्रकरण : कार्यकर्त्यांनी अधिष्ठात्यांना धरले धारेवर

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) कंत्राटी कामाचा ठेका घेतलेल्या सागर शिपेकरप्रकरणी आज, सोमवारी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठूळे यांना कर्मचारी मारहाणप्रकरणी जाब विचारला.तीन दिवसांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया विभागामध्ये काम करणारे शिपाई दत्तात्रय कांबळे यांना शिपेकर याने मारहाण केल्याचा प्रकार सीपीआर आवारात घडला होता. याप्रश्नी आज भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. कोठूळे यांची भेट घेऊन ‘शिपेकर हा ठेकेदार नव्हे, ठेका कुणाच्या नावावर आहे, शिपेकर हा कोण आहे? ’अशा प्रश्नांची सरबत्ती केली. संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केली.सागर शिपेकर याने २८ नोव्हेंबरला कांबळे यांना किरकोळ कारणावरून मारहाण केली. शिपेकरवर कारवाई न करता त्याला प्रशासन पाठीशी घालत आहे, असा आरोप सखाराम कामत यांनी केला. यापूर्वीही शिपेकरने डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ केली आहे. या परिसरात काम करणारे सर्वच अधिकारी, कामगार, कर्मचारी दहशतीखाली वावरतात. कंत्राटी पद्धतीने कामगारांना पुरविण्याचा ठेका कुणाच्या नावावर आहे, या कामगारांना दिलेले जाणारे वेतन किमान वेतनाप्रमाणे नाही. संबंधिताला अनेकवेळा मुदतवाढ दिलेली आहे. त्याचे कार्यालय कोणत्या अटींवर दिले आहे. त्याचे भाडे वसूल केले जाते का? शासकीय नियमांनुसार ठेकेदारावर नियंत्रण ठेवणारी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे ठेका बंद करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून पोलीस ठाण्यामध्ये ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोठूळे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. तत्पूर्वी, सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.शिष्टमंडळात बाळासाहेब बेलेकर, वर्षा कांबळे, भाऊसाहेब काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कांबळे, शिवाजी खामकर, सुरेश भोसगोल, विजय कांबळे, राजू वसरगे, बंकट थोडगे, भीमराव जैताळकर, आदींचा सहभाग होता.कर्मचारी मारहाणप्रकरणी समिती नेमण्यात आली आहे. समितीला या प्रकरणाचा अहवाल लवकर देण्याचे सांगितले आहे.- डॉ. दशरथ कोठूळे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर.