शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील भाजपमध्ये येणार हा शोध कोणी लावला - राधाकृष्ण विखे पाटील 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 5, 2024 19:44 IST

राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याने ते भाजपमध्ये जातील असा आरोप केला होता

कोल्हापूर : आमदार सतेज पाटलांचा कोणता व्यवसाय आहे मला माहिती नाही पण त्यांचा दोन नंबरचा व्यवसाय म्हणून ते भाजपमध्ये येतात याचा शोध कोणी लावला हे मला माहित नाही अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याने ते भाजपमध्ये जातील असा आरोप केला होता.अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अबकी बार ४०० ही घोषणा पुर्णत्वास जाईल. एकीकडे नागरिकांचा पंतप्रधानांवर विश्वास आहे, मात्र दुसऱ्या बाजूला काहीच नाही, केवळ अधोगती आहे. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले आहे. लोकांचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही म्हणून लोक आता पर्याय शोधत आहेत. त्यामुळे बहुतांशी मंडळी भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत.राजाराम कारखान्याच्या एमडींना झालेल्या मारहाणीबद्दल ते म्हणाले. सहकार क्षेत्रातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला मारहाण करणे योग्य नाही. कोणी कायदा हातात घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांच्याकडे दाद मागायला हवी होती. कायदा हातात घेणे योग्य नाही.

न्याय यात्रेमुळे उरलेले राज्यही जातीलते म्हणाले, राहुल गांधींची यात्रा काही नवीन नाही. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या यात्रेनंतर तीन राज्यात त्यांचा दारुण पराभव झाला. आत्ताच्या यात्रेमुळे थोडेफार जी राज्य शिल्लक आहेत ती सुद्धा जातील. शिल्लक नेतेही पक्षात राहणार नाहीत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर