चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापूरची व्हाईट आर्मी धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:16 PM2021-07-29T13:16:41+5:302021-07-29T13:18:51+5:30

Flood Chiplun Kolhapur : महापुराच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापुरातील व्हाईट आर्मी धावून गेली. या आर्मीने चिपळूण परिसरातील तीन गावांमधील लोकांना स्थलांतरित केले आहे. देशात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी जाणाऱ्या व्हाईट आर्मी च्या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.

The White Army of Kolhapur rushed to the aid of Chiplunkar | चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापूरची व्हाईट आर्मी धावली

महापुराच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापुरातील ह्यव्हाईट आर्मीह्ण धावून गेली. या आर्मीने चिपळूण परिसरातील तीन गावांमधील लोकांना स्थलांतरित केले आहे.

Next
ठळक मुद्देतीन गावांतील लोक, रुग्णांना स्थलांतरित केले बारा जणांच्या पथकाची कामगिरी : पूरग्रस्तांना दिलासा

कोल्हापूर : महापुराच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापुरातील व्हाईट आर्मी धावून गेली. या आर्मीने चिपळूण परिसरातील तीन गावांमधील लोकांना स्थलांतरित केले आहे. देशात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी जाणाऱ्या व्हाईट आर्मी च्या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.

मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीला महापूर आला. त्यामुळे चिपळूण शहर आणि परिसर पाण्याखाली गेला. हे समजताच दि. २२ जुलै रोजी त्याठिकाणी मदतकार्यासाठी कोल्हापूरमधून व्हाईट आर्मीचे बारा जणांचे पथक अत्यावश्यक वस्तू घेऊन दोन बोटींसह रवाना झाले. चिपळूण स्टँडजवळील हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांना आयसीयु कक्षातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. गरोदर महिलांनाही सुखरूपपणे स्थलांतरित केले.

चिपळूणमध्ये मदतकार्य करणाऱ्या ह्यव्हाईट आर्मीह्णच्या पथकात सुधीर गोरे (टीम लीडर), नीलेश वणकोरे, प्रदीप ऐनापुरे, विनायक भाट, राजेश्वरी रोकडे, सुमित साबळे, नीलेश तवंदकर, नितीन लोहार, सत्यजित साळोखे, आकाश पाटील यांचा समावेश होता.

आपत्ती व्यवस्थापनमध्ये गेल्या २० वर्षांपासून व्हाईट आर्मी कार्यरत आहे. कोल्हापूर, सांगली, उत्तराखंड येथील महापूर, केरळमधील त्सुनामी... आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा राबविली आहे. माणुसकीच्या नात्याने मदतकार्य केले जाते. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच यावर्षी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्हाईट आर्मीच्या टीमने तेथे जाऊन मदतकार्य केले. सुमारे चारशे पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.
- अशोक रोकडे,
संस्थापक, व्हाईट आर्मी.

Web Title: The White Army of Kolhapur rushed to the aid of Chiplunkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.