शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘व्हाईट आर्मी’च्या आदम मुल्लाणींच्या परिवारास लाखाचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 18:07 IST

मुल्लाणी यांच्या अपघाती निधनानंतर ‘लोकमत’ने याबाबत आवाहन केले होते. ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभ दिनाचे औचित्य साधून शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर : महापुराच्या काळात ‘देवदूत’ म्हणून काम करणाऱ्या ‘व्हाईट आर्मी’चे जवान आदम मुल्लाणी यांच्या परिवारास मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने १ लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. मुल्लाणी यांच्या अपघाती निधनानंतर ‘लोकमत’ने याबाबत आवाहन केले होते. ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभ दिनाचे औचित्य साधून शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला.आदम यांची सातवीतील मुलगी नाझिया आणि मुलगा आदनान यांच्या नावावर प्रत्येकी ५० हजार रुपयांची ठेवपावती ठेवणार असल्याचे रोकडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशांत शेंडे, सौरभ पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार सतेज पाटील, लोकमतचे संपादक वसंत भोसले, आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, अशोक रोकडे, अरुणकुमार डोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करणारे आदम हे अनेक वर्षे व्हाईट आर्मीचे आघाडीचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. २०१९ च्या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी १५ दिवस पूर्णवेळ मदतकार्य केले होते. भरपुरामध्ये यांत्रिकी बोट चालवत रुग्णांना ने-आण करण्यापासून ते ग्रामस्थांना मदत पोहोचवण्यापर्यंतची कामगिरी ते रोज करत होते.आदम हे १५ मार्च २०२० रोजी खासगी गाडी घेऊन कर्नाटकमधील हसन जिल्ह्याकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. २० मार्चला ‘लोकमत’ने ‘कोल्हापूरच्या महापुरातील देवदूताचा संसार पडला उघड्यावर’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत अनेक स्वयंसेवी संस्थांनी या परिवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील मृत्युंजय प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष आणि मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी सावंत आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे यांनी या परिवाराला लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या कालावधीमध्ये हा धनादेश देणे प्रलंबित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLokmatलोकमत